चंद्रपूर जिल्ह्यातील वाहतुकदारांच्या वाहतूक भाड्यात दरवाढ करावी

◆महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रविश सिंग यांची मागणी
◆ केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांना निवेदन

चंद्रपूर : जिल्ह्यातील सुरू असलेल्या विविध प्रकल्पात केवळ रोजगारातच नव्हे तर प्रकल्पाच्या पूर्णत्वास लागणाऱ्या प्रत्येक घडामोडीत स्थानिक भूमिपुत्रांनाच सामावून घ्यावे या आणि जिल्ह्यातील काही प्रश्नांबाबत मनसे चे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रविश सिंग यांनी केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली व याविषयी माहिती सादर करून सविस्तर चर्चा केली, जिल्ह्यातील विविध खाणी तसेच औद्योगिक प्रतिष्ठान येथे स्थानिक भूमिपुत्रांना सेवेत सामावून घेण्याबाबत चा कायदा सर्रास ध्याब्यावर बसविला जातो अश्यावेळी केंद्रात असलेले वैदर्भीय मंत्री म्हणून आपण जातीने लक्ष घालावे असे राविश सिंह यांनी गडकरी यांच्याकडे मागणी केली.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला, यावेळी ही भेट घडवून आणणारे मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी व भेटी दरम्यान उपस्थित असलेले, राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले यांनीही पूर्व विदर्भातील विविध प्रकल्पात होत असलेल्या चुकीच्या गोष्टींचा आढावा केंद्रीय मंत्री गडकरी यांना सादर केला, या चर्चेच्या वेळी कामगार सेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रविश सिंग यांनी डिजल दरवाढीच्या गंभीर प्रश्नांकडे केंद्रीय मंत्र्यांचे लक्ष वेधले ट्रक वाहतुकदारांवर अल्प नफ्यात वाहतूक करावी लागत असल्याने येणाऱ्या अडचणींचा निपटारा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था व वाहतुकीचे दर वाढवून द्यावे यासंबंधी आपण केंद्रीय मंत्री या नात्याने प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे राहुल बालमवार सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.