चौघांना पोलिस कोठडी तर नऊ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

 जिवती तालुक्यातील ‘जादुटोना भानामती’ मारहाण प्रकरण

चंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती तालुक्यात ‘जादुटोना भानामती’ केल्याच्या संशयावरून मारहाण केल्या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटकेत असलेल्या 13 आरोपींना आज राजूरा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यापैकी चार आरोपींना पोलिस कोठडी तर उर्वरित नऊ आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वणी खुर्द गावातील हुके व कांबळे कुटुंब हे जादूटोणा करतात असा समज करून अन्य काही लोकांच्या मदतीने त्यांना दोरखंडाने भर चौकात बांधून काही लोकांनी शनिवारी जबर मारहाण केली. सदर प्रकरणाची माहिती मिळताच जिवती पोलीसांनी गावात जाऊन जखमी झालेल्या शांताबाई कांबळे (53), शिवराज कांबळे (74), साहेबराव हुके (48), धम्मशीला हुके (38), पंचफुला हुके (55), प्रयागबाई हुके (64), एकनाथ हुके (70) यांना रूग्णालयात भरती केले. पोलिसांच्या समयसुचकतेने मोठा अनर्थ टळला.मात्र यात दोघे जण किरकोळ तर पाच जणांना जबर मारहाण झाली.

पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांनी, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीं सुग्रीव रामाराव शिंदे, बालाजी कांबळे,दादाराव कोटंबे,गोविंद संभाजी येरेकर,केशव श्रावण कांबळे,माधव तेलंगे,दत्ता शिवाजी भालेराव,सुरज कांबळे, सिध्देश्वर शिंदे, दत्ता कांबळे, प्रकाश कोटोंबे, अमोल शिंदे, संतोष पांचाळ या तेरा आरोपींना अटक केली.

आज सोमवारी राजुरा येथील न्यायालयात तरिही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यापैकी दत्ता कांबळे, प्रकाश कोटंबे, अमोल शिंदे, संतोष पांचाळ या आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली तर उर्वरित सुग्रीव रामाराव शिंदे, बालाजी कांबळे,दादाराव कोटंबे,गोविंद संभाजी येरेकर,केशव श्रावण कांबळे,माधव तेलंगे,दत्ता शिवाजी भालेराव,सुरज कांबळे, सिध्देश्वर शिंदे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
पुढील तपास उपविभागिय पोलिस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरिक्षक संतोष अंबिके करित आहे.