उद्या सर्वपक्षीय घुग्घुस बंद ; मुख्यमंत्री यांना सर्वपक्षीय निवेदन, नगरपरिषद करीता शेवटची झुंज

0
447
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : जिल्ह्यातील श्रीमंत असलेल्या ग्रामपंचायतला नगरपरिषद मध्ये रूपांतर करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या प्रयत्नाने प्रथम अधिसूचना ही 31 आगस्ट रोजी जाहीर करण्यात आली तेंव्हा पासून नगरपरिषद निर्मितीची प्रक्रिया शासकीय स्तरावर शुरू आहे.

मात्र मुदत संपलेल्या 14 हजाराच्या जवळपास असलेल्या ग्रामपंचायतचे 15 जानेवारी निवडणूक होत असल्याने यामध्ये घुग्घुस ग्रामपंचायत समाविष्ट असल्याने राजकीय पक्ष उमेदवार व नागरिकांत संभ्रम पसरला एकीकडे राज्य शासनाने तीन महिने निवडणूक रद्द करा असा निवेदन निवडणूक आयोगाला केलेला आहे.
मात्र अजून निवडणूक आयोगाचा कुठलाच निर्णय न आल्यामुळे आज दिनांक 23 डिसेंम्बर रोजी ग्रामपंचायत कार्यलयाच्या प्रांगनात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली यामध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बी.आर.एस.पी, बसपा,रिपाई, यंग चांदा ब्रिगेड,सह विविध सामाजिक संघटनेने एकमताने ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार घातला व कुणी ही निवडणूक न लढविण्याची शपथ घेतली यावेळेस ज्या उमेदवारांनी निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी ग्रामपंचायत मधून नादेय प्रमानपत्रासह इतर दस्तावेज घेतले होते ते परत केले व अन्य कुणी जर दाखले घ्यायला आल्यास त्याला विनम्रपणे माघार घेण्यासाठी विनंती करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले व उद्या दिनांक 24 डिसेंम्बर रोजी नगरपरिषदच्या लक्षवेधी मागणी करीता घुग्घुस बंदचे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी गावात फिरून केले आहे.
यासोबत सर्वपक्षीय नेत्यांच्या स्वाक्षरीचे पत्र मुख्यमंत्री यांना देण्यात येणार असल्याचे ही सांगितले.