रामाला तलावासाठी अन्नत्याग सत्याग्रहात ५ जणांचे साखळी उपोषण

0
48

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची भेट

चंद्रपूर : रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ बंडू धोतरे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी इको प्रोचे सदस्य आणि शहरातील नागरिकानी बुधवारपासून साखळी उपोषण सुरु केले. माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अन्नत्याग सत्याग्रहाला भेट दिली. यावेळी अध्यक्ष बंङू धोतरे यांच्याशी मागण्याच्या अनुषंगाने चर्चा केली. आज बुधवारी (दि. २४) उपोषणाचा तिसरा दिवस होता. दिवसभरात शहरातील विविध संस्था, संघटनांच्या पदाधिका-यांनी भेटी देऊन पाठिंबा दिला. मंगळवारी तलावातील प्रदूषित पाणी उपसा करून तलावातील प्रदूषण दूर करण्याचा संदेश देण्यात आला. आजपासून सुरु झालेल्या साखळी उपोषणात सेवानिवृत्त, विभागीय वनाधिकारी अभय बडकेलवार, धर्मेंद्र लुनावत, अनिल अडगुरवार, हरीश मेश्राम, प्रतीक मुरकुटे बसले होते.

आज दिवसभरात शहरातील शिवनारायण सारङा, ङाॅ. अशोक जीवतोङे, पंकज शर्मा, अरविंद सोनी, आनंद वाघमारे, ज्येष्ठ व्हाॅलिबाॅल बहुद्देशीय संस्थेचे दीपक जेऊरकर, प्रदीप जानवे, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, ॲङ. राजेश विरानी, एलआयसीचे निवृत्त मुख्य प्रबंधक राजू गुंङेटी, जैन स्थानिक श्रावक संघाचे योगेशकुमार भंडारी, बंगाली समाज एकता बहुउद्देशीय संस्थेचे अमीतकुमार बिस्वास, सुशिलाबाई रामचंद्र मामीङवार काॅलेज ऑफ सोशल वर्कचे प्राचार्य सुनील साकुरे, पेट्रोलियम ङिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष घनश्यामसिंह दरबार, राकेश टहिलियानी, दिनेश बजाज यांनी भेट देऊन पाठिंबा दिला. यासह ङेबू सावली (वृद्धाश्रम) बहुद्देशीय विकास संस्था, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य व सामाजिक वनीकरण कार्यालयीन कर्मचारी संघटना, फर्नीचर असोसिएशन, भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार पार्टी पाठिंबा देत जिल्हाधिकायां-ना निवेदन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here