भारतीय लॉयड्स मेटल कामगार संघाच्या वतीने स्थापना दिवस साजरा

घुग्घुस : येथील लॉयड्स मेटल कंपनीच्या भारतीय लॉयड्स मेटल कामगार संघाच्या कार्यालयात भारतीय मजदूर संघाचा स्थापना दिवस उत्साहात कामगारांनी साजरा केला.

याप्रसंगी भारतीय लॉयड्स मेटल कामगार संघाच्या फालकाची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते भारतीय मजदूर संघाचे संस्थापक स्व. दंतोपंत ठेंगडी व भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिठाई व बिस्कीटचे वाटप करण्यात आले.

यावेळी घुग्घुस लॉयड्स मेटल कंपनीचे वीपी प्रशांत पुरी, मुख्य कार्मिक प्रबंधक दिनेश पाटीदार, एचआर राजेश गारगे, संघटनमंत्री राजन्ना महाकाली, कार्याध्यक्ष समीर शील, महामंत्री हिवराज बांगडे, उपाध्यक्ष प्रमोद येलचलवार, कोषाध्यक्ष विठ्ठल ठाकरे, पंकज रामटेके, राजेंद्र क्षीरसागर, युसूफ शेख, राजास्वामी जंगम, संतोष चिंताला, सुनील लठ्ठा, सुधीर बावणे, उमेश पिदूरकर, भास्कर कुचनकर, सतीश पिंपळकर, विजय माथनकर व कामगार उपस्थित होते.