डम्पिंग यार्डात गाढलेल्या सुगंधीत तंबाखू, गुटखाची विक्री

0
263
Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

ऑटोतून विक्री साठी नेताना दोन कामगारांना पकडले

चंद्रपूर : बंदी नंतरही खुलेआम विक्री करीत असताना अन्न व औषध प्रशासनाने जिल्हाभरात जप्त केलेला सुगंधीत तंबाखू व गुटखा शहरातील कचरा डम्पिंग यार्डात गाढण्यात आला. मात्र दोन खाजगी कामगारांनी गाढलेला सुगंधीत तंबाखू आणि गुटखा बाहेर काढून विक्री करण्यासाठी नेताना त्यांना पकडण्यात आल्याची घटना नुकतीच चंद्रपुरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी रामनगर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
महानगर पालिकेतर्फे चंद्रपूर बल्लारपूर रोडवरील अष्टभुजसमोर असलेल्या घनकचरा डम्पिंग यार्डात जमा केल्या जातो. शहरातील विविध प्रकाराचा कचराही याच ठिकाणी टाकल्या जातो. सध्या सुगंधीत तंबाखू आणि गुटख्यावर बंदी असतानाही खुलेआम पणे विक्री केली जात आहे.

अनन व औषधी प्रशासनाने अशा प्रकारचा साहित्या जप्त करून ते याच यार्डात गाढलेले आहे. मात्र यार्डात गाढलेले सुगंधीत तंबाखू आणि गुटखा यार्डातून काढून शहरातील इतर दुकानांमध्ये विक्री करण्यासाठी नेत असताना दोन खाजगी कामगारांना काही लोकांनी पकडले. सदर प्रकार कामगार करीत असतानाची माहिती अन्न व औषधी प्रशासन यांना देण्यात आली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी कचरा यार्डातून सुगंधीत तंबाखू आणि गुटखा नेत असताना त्यांना पकडण्यात आले आहे. या प्रकरणावरून अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही केल्या जात असाव्या असा संशय वर्तविला जात आहे. मनपा प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.