भाजपाचे सचिव राघवन यांचा महिलांसोबत शर्टलेस होऊन व्हिडीओ चॅट करतानाच Video Viral

व्हिडिओ समोर आल्यानंतर राघवन  यांचा राजीनामा

तामिळनाडूमधील भाजपाचे सचिव  आणि राज्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित प्रमुख नेत्यांपैकी एक के. टी राघवन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राघवन यांनी युट्यूबवर एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजीनामा दिला  असल्याचे सांगण्यात येत आहे.

राघवन यांनी महिलांसोबत चुकीच्या पद्धतीने वर्तन केल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत असून हा व्हिडीओ भाजपाच्या सदस्यांनीच जारी केला होता. पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांबरोबर शर्टलेस होऊन व्हिडीओ चॅट करताना दिसत आहे.

मदन रविचंद्रन यांनी मंगळवारी सकाळी हा व्हिडिओ अपलोड केला आहे असून राघवन यांचे असे जवळपास १५ व्हिडिओ त्यांच्याकडे असल्याचं म्हटलंय. तसेच प्रदेशाध्यक्ष के अन्नामलई यांच्या सल्लामसलत करून हा व्हिडिओ रिलीज करण्याचा निर्णय घेतला. पीडितेला न्याय मिळवून देण्यास व्हिडिओ रिलीज करण्यास अन्नामलई यांनी सांगितल्याचा दावा रविचंद्रन यांनी केला आहे.