चंद्रपुरात देहविक्रीचा अवैद्य व्यवसाय करणा-या दोन महिलांवर गुन्हे दाखल

◆ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोगस ग्राहकाव्दारे केली देहव्यापाराची खात्री
◆ परराज्यातील तीन मुलींची केली सुटका

चंद्रपूर : शहरातील गौतमनगर येथे अवैद्य देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी टाकलेल्या धाडीत राजस्थान, मध्यप्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील तीन मुली आढळून आल्या. पोलिसांनी दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला. राजस्थान, मध्यप्रदेश आणि तेलंगणा राज्यातील तीन मुलींची सुटका करून स्त्री आधार गृहात रवानगी केली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वातील पथकाने काल शनिवारी ( २५ सप्टेंबर 2021) ला केली आहे.
पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना अवैधरित्या देहव्यापार करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला चंद्रपूर शहर पोलिस ठाणे हद्दीतील गौतमनगर परिसरात काही महिलांकडून अल्पवयीन मुलींकडून अवैधरित्या देहव्यापार केला जात असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गौतमनगर येथे बोगस ग्राहक पाठवून देहव्यापार केला जात असल्याची खात्री केली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला.

यावेळी दोन महिला दुसऱ्या राज्यातील मुलींकडून देहव्यापार करीत असल्याचे आढळून आले. त्यानंतर या दोन महिलांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तर, राजस्थान, मध्यप्रदेश आणि तेलंगणा राज्यातील तीन मुलींची सुटका करून स्त्री आधार गृहात रवानगी केली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, नियंत्रण कक्षाचे पोलिस निरीक्षक पुसाटे, सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, पोलिस उपनिरीक्षक अतुल कावळे, नितीन जाधव, संजय आतकुलवार, सुधीर मत्ते, नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरे, प्रांजल झिलपे, रवींद्र पंधरे, निराशा तितरे, अपर्णा मानकर यांच्या पथकाने केली.