शेतकरी आंदोलन समर्थनार्थ काँग्रेस तर्फे घुग्घुस 100% बंद 

घुग्घुस : देशातील जनतेला फसवे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी शासनाने हुकूमशाही राजवटीच्या धर्तीवर देशातील शेतकऱ्यां विरोधात तीन नवीन काळे कायदे मंजूर केले. हे नवीन कायदे शेतकऱ्यांना जाचक व उध्वस्त करणारे असल्याने हे कायदे मागे घेण्यात यावे या मागणीला घेऊन मागील अकरा महिन्या पासून देशातील शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करीत आहे.

अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू झालेले आहे.
शेतकऱ्यांची बाजू ऐकून समस्यां तातळीने सोडविण्या ऎवजी उद्योगपतीचे कैवारी हे शेतकऱ्यांवर विविध स्वरूपाचे अन्याय अत्याचार करीत आहे.

शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ तसेच पेट्रोल – डिजल – स्वयंपाक गॅस महागाईच्या निषेधार्थ, बेरोजगारीच्या निषेधार्थ आज सकाळ पासूनच काँग्रेस तर्फे भारत बंदला सहयोगा करिता व्यापारी बांधवाना घुग्घुस बंद करिता विनंती करण्यात आली काँग्रेसच्या विनंतीला मान देऊन शंभर टक्के व्यापारी बांधवानी आपली दुकाने बंद ठेवून शेतकऱ्यां प्रति आदर व समर्थन व्यक्त केला.

सदर बंद हे काँग्रेस नेते राजूरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले याप्रसंगी युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तौफिक शेख, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष दिलीप पिट्टलवार , शेख शमीउद्दीन, नुरुल सिद्दिकी, रोशन दंतलवार, इर्शाद कुरेशी, विशाल मादर,विजय माटला, शुभम घोडके, राकेश खोब्रागडे,अमित सावरकर, देव भंडारी, साहिल सैय्यद, सचिन कोंडावार, अमित रामगिरी, जुबेर शेख, कुमार रुद्रारप, आरिफ शेख, वस्सी शेख,कपिल गोगला, सुनील पाटील, प्रतीक रामटेके, तिरुपती महाकाली, शफी शेख, छोटू सिद्दिकी, कोंडय्या तलारी,रियाज शेख,व मोठ्या संख्येने पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते