राज्यात पुढील 48 तासांत अतिवृष्टी; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पुढील 48 तासांत म्हणजेच 27 आणि 28 सप्टेंबर रोजी राज्यातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

एका दिवसात 20.5 सेंटीमीटर पेक्षा जास्त पाऊस तसेच मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

तसेच 28 तारखेला अतिवृष्टी इशाराही हवामान विभागाने वर्तवला आहे.