जनसंपर्क कार्यालय हे जनसेवेचे केंद्र बनावे

खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते इंटक युवक काँग्रेस जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन

चंद्रपूर : जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचवून व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवून काँग्रेस पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करा. जनसंपर्क कार्यालय हे जनसेवेचे केंद्र बनावे असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते चंद्रपूर येथील इंटक युवक काँग्रेस अध्यक्ष प्रशांत भारती यांच्या जनसेवा कार्यालयाच्या उद्घाटन समारंभ सोहळ्यात बोलत होते.

आमदार प्रतिभाताई धानोरकर, काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष दिनेश चोखारे, काँग्रेस जेष्ठ नेते विनोद दत्तात्रय, नगरसेविका सुनीता लोढीया, काँग्रेस जेष्ठ नेते के. के. सिंग, अध्यक्ष इंटक युवक काँग्रेस प्रशांत भारती, जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग सोहेल रजा, ओबीसी नेते उमाकांत धांडे, जिल्हा ट्रांस्पोर्ट अध्यक्ष इरफान शेख, झोन सभापती अमजद अली, सरपंच ऊर्जानगर मंजुषा येरगुडे, अशोक मत्ते, श्याम थेरे, राजू रेड्डी, सचिन कत्याल, ग्राम पंचायत सदस्य सागर तुरक, मनोज खांडेकर, कुलदीप बावरे, नसीमभाई शेख, शारुख अली, अशोक चौरे, साहिल शेख, आदिल खान, समीर शेख, अमीर शेख, रवी दुर्गे, रम्मी अहमद, इमरान भाई यांची उपस्थिती होती.

पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचे काम केले जाणार आहे. सरकारच्या विविध योजना या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचवला जाणार असून याचा लाभ जनतेला दिला जाणार आहे. त्यामुळे हे कार्यालय विकासाचे केंद्र बिंदू ठरेल, असे काम या कायालयाच्या माध्यमातून करा आणि काँग्रेस पक्ष मजबूत करा असे आवाहन त्यांनी केले.