WCL अप्रेंटशिप मध्ये 80% स्थानिकांना प्राधान्य द्या; काँग्रेसची मुख्य महप्रबंधकांना मागणी

घुग्घुस : वेकोलीच्या ऊर्जाग्राम ताडाळी येथील मुख्य महाप्रबंधक यांच्या कार्यालयात घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या शिष्टमंडळाने काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांच्या नेतृत्वाखाली हेच आर हेड श्री.रामानुजम यांच्याशी भेट घेवून स्थानिक युवकांना अंशीं टक्के प्राथमिकता देण्यासंदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली व निवेदन देण्यात आले.

वेकोली मध्ये अप्रेटशिपच्या (शिकाऊ उमेदवारीच्या) प्रशिक्षणा करिता जागा निघालेल्या असून सदर फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर होती ही उमेदवारांची चाचणी ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून यात देशातील व अन्य राज्यातील अनेक युवक भाग घेतील ही चाचणी मेरिट पद्धतीने घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

यामुळे कोळसा खाणी असलेल्या क्षेत्रातील नागरिकांना धूळ, प्रदूषण, मोठ्या वाहनांचा त्रास, अपघात, रेल्वे साईडिंगचे प्रदूषण सोसावे लागत असल्याने या अप्रेंटशिप मध्ये स्थानिक युवकांना 80% सहभागी करावे अन्यथा घुग्घुस शहर काँग्रेस तर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल याला पूर्णपणे वेकोली प्रशासन जवाबदार राहील.

याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, नुरुल सिद्दिकी, रोशन दंतलवार, इर्शाद कुरेशी,रोहित डाकूर, सचिन कोंडावार,अयुब कुरेशी, जुबेर शेख, धम्मदीप सोनारकर,सुनील पाटील,गौस सिद्दिकी,महीपाल कांबळे, करण रायपुरे, हिमांशू कासवटे, निखिल सातपुते, रोहित गावंडे, रोहित भगत, अजय बाडगुळवार, महेश आरापेल्ली, तरुण नागपुरे, सुजित दुपारे, संदेश पुसाटे, व मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.