बैरमबाबा देवस्थानात शिव मुर्तीची विटंबना परिसरात संतापाची लाट

चंद्रपुर : घुग्घुस येथील कॉलरी नंबर दोन मधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र घुग्घुस नगरीतील कुलदैवत बैरम बाबा देवस्थान परिसरातील शिव मंदिरातील शिव प्रतिमेला अज्ञात माथेफिरू तर्फे मुर्ती विटंबना करण्यात आल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

या मार्गावर कार्यरत चालक तसेच दर्शनाला आलेल्या नागरिकांच्या लक्षात सदर घटना येताच घुग्घुस काँग्रेस अध्यक्ष राजूरेड्डी यांना सदर प्रकरणाची माहिती देण्यात आली असता ते तातळीने घटनास्थळी दाखल झाले व पोलिसांना घटनेची माहिती दिली. प्रकरणाची गंभीरता बघता ठाणेदार राहुल गांगुर्डे यांनी तातळीने घटनास्थळ गाठले व विटंबीत मूर्तीला झाकून तपास शुरू केला आहे.

हे प्रकरण अत्यन्त गंभीर असून तातळीने अज्ञात आरोपीला अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राजूरेड्डी यांनी केली आहे.