जडवाहतुक विरोधात व खराब रस्त्या दुरुस्ती करिता काँग्रेसने दोन तास वाहतूक रोखली 

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

घुग्घुस : वेकोलीच्या पैनगंगा कोळसा खाणीतुन कोळश्याची वाहतूक एसीसी घुग्घुस व घुग्घुस महातरदेवी मार्गाने होत असते. या जडवाहनामूळे ग्रामीण क्षेत्राच्या वापराचा दहा टन क्षमतेचा घुग्घुस महातारदेवी रसत्यावर जागोजागी मोठे – मोठे खड्डे पडले असून यामध्ये पावसाळ्यात पाणी साचून अपघात होतो. व उन्हाळ्यात धुळामुळे अपघात होतो परिसरातील नागरिक व व्यापारी यांच्या घरात व दुकानात धुळामुळे उठने- बसने कठीण झाले आहे.

या मार्गावर अपघातात दहाच्या वर नागरिकांचे जीव गेले आहेत. या मार्गासह शहरातील मुख्य मार्गावरील जडवाहतुकी करिता तातळीने बायपास मार्गचा प्रश्न मार्गी लावावा सर्व प्रमुख मार्गावर उद्योगा तर्फे पाणी मारण्यात यावे. जडवाहतूक पुर्णतः बंद करावी.
तातळीने रस्ता दुरुस्ती करण्यात यावी या मागणी करिता घुग्घुस शहर काँग्रेस तर्फे जिल्हाध्यक्ष प्रकाशजी देवतळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष राजूरेड्डी व कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वात राजीव रतन चौक घुग्घुस महातरदेवी मार्गावर दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत रस्ता रोखून धरण्यात आले.
घुग्घुस पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल गांगुर्डे व एपीआय मेगा गोखरे यांच्यासह पोलीस ताफा सज्ज होता.

ठाणेदार यांनी काँग्रेस तर्फे करण्यात आलेल्या मागण्या वरिष्ठांना पाठविण्यात आले असून लवकरच तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन देण्यात आल्याने सदर आंदोलन दहा दिवसांनच्या कालावधी साठी मागे घेण्यात आला.

याप्रसंगी इंटक नेते लक्ष्मणजी सादलावार, शामरावजी बोबडे,महिला काँग्रेस अध्यक्ष सौ. विजया बंडेवार, युवक अध्यक्ष तौफिक शेख, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष दिलीप पिटलवार,राष्ट्रवादी नेते सत्यनारायण डकरे,अजय पाटील, महातारदेवी सरपंच प्रिया गोहणे,सौ.संगीता बोबडे, सौ.पुष्पा नक्षीने, श्रीमती संध्या मंडल, श्रीमती अमिना बेगम, श्रीमती दुर्गा पाटील,सौ.सुनंदा नांदे, सौ.माधुरी ठाकरे,सौ.मंगला बुरांडे, सौ.दीपा बोकडे, श्रीमती सरस्वती कोवे, मीराबाई तुरणकार, सौ.सरिता गौरकार,संजय टिपले ग्रा.पं सदस्य महातारदेवी, संध्या पाटील ग्रा.पं सदस्य,अस्मिता पाझारे,मंगला देहरकार,सरिता टिपले, शेख शमीउद्दीन, अलीम शेख, नुरुल सिद्दीकी, इर्शाद कुरेशी, रोशन दंतलवार,विशाल मादर, रोहित ठाकूर, देव भंडारी, सिनू गुडला, साहिल सैय्यद, कपिल गोगला, जुबेर शेख, अय्युब कुरेशी, सुकुमार गुंडेटी, अमित रामगिरी,बल्ली भाई, शुभम घोडके, खादिम शेख,नानी मादर, आकाश आवळे, सुनील पाटील, बालकिशन कुळसंगे, विशाल नागपुरे, साहिल सैय्यद,संजय कोवे,खुशाल गोगला,सोनू दुर्गम,छोटू सिद्दिकी,व मोठ्या संख्येने पदाधिकारी सदस्यगण, व नागरिक उपस्थित होते.