गोंदिया-बल्लारशा पॅसेंजर रेल्वेगाडीचा ब्रम्हपुरी स्थानकावर जल्लोषात स्वागत

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

ब्रम्हपुरी : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे यांच्या नेतृत्त्वात चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोलीच्या कार्यकर्ता तथा आयटक सलग्न कामगार संघटनांनी गोंदिया-बल्लारशा, कटंगी-बालाघाट पॅसेंजर रेल्वेगाडी सुरू करण्यासाठी १५ सप्टेंबर २०२१ रोजी सौंदड रेल्वे स्टेशनवर विशाल आंदोलन करण्यात आले होते.

रेल्वे त्वरीत सुरू न झाल्यास १५ दिवसांत त्या अंतर्गत येणार्‍या सर्व रेल्वे स्टेशनवर रेल रोके करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाची दखल रेल्वे प्रशासनाने घेत मागील दीड वर्षापासून बंद असलेली गोंदिया-बल्लारशहा ही पॅसेंजर गाडी २८सप्टेंबर २०२१ मंगळवार पासून सुरू करण्यात आली. सदर पॅसेंजर रेल्वेगाडी गोंदिया वरून सकाळी ७.४० वाजता सुटून ब्रम्हपुरी येथे १०.३० वाजता रेल्वे स्थानकावर पोहचताच तिचे मोठ्या हर्षोल्लासात स्वागत करण्यात आले.

रेल्वे विभागाने मागील वर्षी मार्च महिण्यात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठीr पॅसेंजर गाड्या बंद केल्या होत्या. कोरोनाचा प्रादूर्भाव आटोक्यात आल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. सर्वच व्यवहार सुरळीत झाले आहे. मात्र, पॅसेंजर व लोकल गाड्या सुरू झाल्या नव्हत्या. त्यामुळे प्रवाश्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत होता. छोट्या मोठ्या व्यवसायिकांसाठी जीवनदायी असलेल्या या पॅसेंजर गाड्या बंद असल्याने अनेकांचा रोजगार हिरावला होता. पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे यांच्या नेतृत्त्वात सौंदड रेल्वे स्टेशनवर विशाल आंदोलन करण्यात आले होते. अखेर दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाने गोंदिया-बल्लारशहा पॅसेंजर गाडी सुरू करण्यासंदर्भात पत्रक जारी करून मंगळवार पासून ही गोंदिया-बल्लारशा मोनो रेल्वे सुरू केली.

गोंदिया येथून ही मोनो रेल्वे सकाळी ७.४० वाजता सुटून ब्रम्हपुरी येथे१०.३० वाजता ब्रम्हपुरी रेल्वे स्थानकावर पोहचताच तिचे स्थानिक नागरिक, विविध पक्षाचे नेते व पदाधिकार्‍यांमार्फत मोठ्या आनंदात स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी मोनो रेल्वेवर पुष्पवृष्टी करीत मोनो रेल्वेला पुष्पहार अर्पन केले. रेल्वेचालक एम.एम.पराते वर्धा व एल.यु. करबनकर अधिक्षव, रेल्वे स्टेशन ब्रम्हपुरी यांना कॉमे्रड विनोद झोडगे, सतिश श्रीवास्तव, सुरज शेंडे, पत्रकार महेश पिलारे, मामाजी वझाडे, ब्रम्हपुरी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय रामटेके यांनी पुष्पगुच्छ व पुष्पहार देऊन त्यांचे स्वागत केले. प्रसंगी ब्रम्हपुरीहून चंद्रपूर येथे रेल्वे प्रवास करणारे प्रवासी ग्रामसेवक अजय राऊत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी सुनिल तोंडरे, राहूल पांडव, विनोद राऊत, विलास प्रधान, नामदेव उरकुडे माजी सैनिक, उमेश कावळे, दामोधर डांगे, विवेक नरूले, विष्णू ठवरे, पुंडलिक कावळे, विलास प्रधान, बालू राऊत, दामोधर उरकुडे, शंकर डोईजड, बंडूजी चन्ने, पुरूषोत्तम कावळे, जयदेव दोनाडकर, प्रदिप भैसारे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.