CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल आज

नवी दिल्ली : सीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल आज दुपारी जाहीर होणार आहे. याबाबत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. आखिर वो दिन आ ही गया म्हणत सीबीएसईने आज दुपारी निकाल जाहीर करणार असल्याचे सांगितले आहे.

कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे यंदा सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागील इयत्तेतील निकाल आणि कामगिरीच्या आधारावर निकाल जाहीर करण्यात येणार आहे. बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ३० जुलै रोजी दुपारी २ वाजल्यापासून पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना cbseresults.nic.in या वेबसाईटुवर आपला निकाल पाहता येणार आहे.