११ वेळा विधानसभेत निवडून आले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व सांगोलाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री ९ वाजता सोलापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले.दोनच दिवसांपूर्वी त्यांच्यावर पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती. मृत्यूसमयी ते ९६ वर्षाचे होते.

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातुन ११ वेळा विधानसभेत निवडून आले होते. द्रविड मुनेत्र कळघमचे नेते एम.करुणानिधी यांचा विक्रम माजी आमदार देशमुख यांनी मोडला होता. २००९ च्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यादा आमदारकीची निवडणुक जिंकणारे देशमुख हे देशातील दुसरे आमदार होते. त्यांनी तब्बल ५४ वर्षे सांगोलाचे नेतृत केले.

गणपतराव देशमुख यांची वाटचाल

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार गणपतराव देशमुख १५ मार्च १९६२ साली पहिल्यांदा आमदार झाले. आमदारकीमधून वेळ काढून वकिलीचे शिक्षण घेण्यास वेळ मिळाला नाही म्ह्णून त्यांचे वकिलीचे शिक्षण सुटले. आपल्या पहिल्याच आमदारकीच्या अभिभाषणावर भाषण देऊन त्यांनी यशवंतराव चव्हाण यांचीदेखील वाहवा मिळविली होती.

पुण्यात विध्यार्थी दशेत असताना त्यांच्यावर शेकापचे मोरे,जेधे,नाना पाटील,तुळशीदास जाधव यांचा प्रभाव पडत गेला. त्या काळात शंकरराव मोरे पुण्यात मार्क्सवादी विचारांचे अभ्यासवर्ग घेत असत. घरातून देशमुखी असणारे गणपतराव देशमुख या लोकांमुळे खऱ्या अर्थाने लोकांचे झाले.

निस्वार्थीपणे काम करण्याची शिकावं या नेत्यांनी दिली आणि त्यांना पुढे ठेऊनच ते सांगोल्यातून पहिल्यांदा आमदार झाले. ५० वर्षाहून अधिक काळ आमदारकी भोगली . या काळात ११ वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला. पण त्याहून महत्वाचे म्हणजे त्यांनी हे सर्व एकाच शेतकरी कामगार पक्षातून सिद्ध केले.