माजी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त नगर परिषद शाळेत वृक्षारोपण

यवतमाळ : वणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज मराठी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक दोनमध्ये गुरुवारी वृक्षारोपण करण्यात आले. माजी अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.

या वेळी शाळेच्या आवारात विविध फळझाडांची लागवड करण्यात आली. यावेळी भाजपचे माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया, नगर परिषद शाळा क्रमांक चारचे मुख्याध्यापक किशोर परसावार, शाळा २ चे मुख्याध्यापक अविनाश पालवे, नगरसेवा समितीचे अध्यक्ष दिलीप कोरपेनवार, आयोजक शुभम डोंगे उपस्थित होते. या पंधरवड्यात १ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प असल्याचे शुभम डोंगे यांनी यावेळी सांगितले.