गोपानी आयरन अण्ड पॉवर लिमिटेड कंपनीच्या विरोधात कामगारांचे कामबंद आंदोलन

घुग्घुस : आज शनिवार 31 जुलै रोजी सकाळी तडाळी येथील गोपानी आयर्न कंपनीच्या आत 375 कामगारांनी कामबंद आंदोलन सुरु केले. मागील तीन वर्षाच्या करारनाम्याची मुदत 31 मार्च 2020 रोजी संपली असल्यामुळे नवीन पगार वाढीची तसेच इतर मागण्याची पूर्तता करण्यासाठी तडाळी एमआयडीसी येथील गोपानी आयर्न कंपनीच्या कामगारांनी आज शनिवार 31 जुलै रोजी सकाळी कंपनीच्या आत मध्येच कामबंद आंदोलन सुरु केले.

कंपनीत करणाऱ्या सर्व तंत्रज्ञ कामगारांना सेल्गा स्टील इंडस्ट्रीज या ठेकेदारा कडे समाविष्ट करावे. कामाच्या दर्जावरून कामगारांचे ग्रेडेशन करण्यात यावे. दिवाळी बोनस हा एक ग्रास पगार देण्यात यावा. अति कुशल, कुशल, अर्ध कुशल, अकुशल आणि कॅज्युअल कामगार संपूर्ण पगारात वाढ करण्यात यावी. कामगारांना 10 सीएल सुट्टया देण्यात यावे. अपघात झाल्यास कामगारांना 2 लाख देण्यात यावे अश्या मागणासाठी कामगारांनी कामबंद आंदोलन केले आहे.
यात स्थानिक 375 कामगार आहेत तर परप्रांतीय 250 कामगार आहेत.