वाढीवबिल जो पर्यंत राज्यसरकार माफ करणार नाही, तो पर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही – देवराव भोंगळे

0
33

भाजपाचे वीज देयक माफी करिता टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन

प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढून महा आघाडी सरकारचा निषेध

घुग्घूस : अव्वाच्या सव्वा विजबिल पाठवणाऱ्या व विज ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून जनतेला अंधारात टाकण्याचे महापाप करणाऱ्या महविकास आघाडी सरकारच्या विरोधात “टाळा ठोको व हल्लाबोल आंदोलन” माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराजभैय्या अहिर यांच्या मार्गदर्शनात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी, घुग्घूसच्या वतीने शुक्रवार ०५.०२.२०२१ रोजी सकाळी ११ वा.गांधी चौक, घुग्घूस येथे करण्यात आली.

कोरोनाकाळातील वाढीव वीजबिल माफ करावे याकरिता भारतीय जनता पार्टी चंद्रपूर कडून चारदा आंदोलन करण्यात आली ,अजूनही सामान्य जनतेचा आवाज राज्यसरकारच्या कानात जात नाही याचा अर्थ राज्यसरकार बधिर झाली आहे, “जनतेचे मरण,हेच राज्यसरकारचे धोरण” अजूनही विजबिलासंदर्भात सरकार गंभीर नाही, जो पर्यंत वाढीव वीजबिल माफ करणार नाही तो पर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही , घुग्घूस येथील वाढीव वीजबिल आंदोलनात एम. एस.इ.बी कार्यालयात टाळे ठोकून भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी राज्य सरकारला इशारा दिला .

महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेतयात्रा गांधी चौकातून काढण्यात आली.
ही यात्रा घुग्घूस वस्ती, अमराई, विठ्ठल मंदिर, आठवडी बाजार मार्गे मार्गक्रमण करीत बस स्थानक चौकात धडकताच तिथे प्रतिकात्मक प्रेतयात्रेचे दहन केले.
एमएसईबी कार्यालयात जाऊन कार्यालयास टाळा ठोकून टाळा ठोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले गोर गरिबांचे वीज बिल माफ करण्यासाठी भाजपाने 4 वेळा आंदोलन केले. याची दखल घेऊन सरकारने वीज बिल माफ करू असे उत्तर दिले. विधानसभेत 100 युनिट प्रति महिना माफ करू असे सांगितले, ऊर्जा मंत्र्यांनी सुद्धा वीज बिल माफ करू असे आश्वासन दिले होते. हे सरकार फसवे, खोटे आश्वासन देणारे दिशाभूल करणारे सरकार आहे. सरकारने वीज माफिचा शब्द पाळला नाही.
केंद्र सरकार लॉकडाऊनच्या काळात सामान्य जनतेच्या पाठीशी खंबीर उभी राहिली देशातील गोरगरीब जनतेला धान्य वाटप, उज्वला गॅस वितरण व जनधन खात्याच्या माध्यमातून गरिबांना आर्थिक मदत केली पण राज्य सरकार मात्र राज्यातील जनतेला कोणतेही मदत करायला तयार नाही याउलट राज्यातील 75 लाख गोर गरीब कुटुंबियांना वीज कनेक्शन कापण्याची नोटीसा देऊन 4 कोटी जनतेला अंधारात ठेवण्याचे महापाप करत आहे.
कोणताही एम एस इ बी चा कर्मचारी वीज कनेक्शन कापण्यासाठी सामान्य जनतेच्या घरी पोहचला तर भाजपाचा कार्यकर्ता वीज खंडित होऊ देणार नाही. एमएसईबी चे कर्मचारी वीज कनेक्शन कापण्यास गेले तर भाजपाचा कार्यकर्ता परतवून लावेल. असे ते म्हणाले आंदोलना दरम्यान कुठं गेले कुठं गेले 200 युनिट कुठं गेले, महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद, काँग्रेस सरकार मुर्दाबाद, वीज बिल माफ करा नाहीतर खुर्ची खाली करा , वीज बिल आम्हचा अधिकार आहे असे नारे लावण्यात आले.

याप्रसंगी घुग्घूस चे ठाणेदार राहुल गांगुर्डे तसेच महावितरण चे सहाय्यक अभियंता अमोल धूमणे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, तालुकाध्यक्ष नामदेव डाहुले, युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे, जिल्हा महामंत्री अनिल डोंगरे, प.स.माजी उपसभापती निरीक्षण तांड्रा,माजी सरपंच संतोष नुने, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय तिवारी, साजन गोहणे, प्रकाश बोबडे,सिनु इसारप,सुचिता लुटे,वैशाली ढवस, नंदा कांबळे, पूजा दुर्गम, नकोडा माजी उपसरपंच किरण बांदूरकर, मार्डा माजी सरपंच पारस पिंपळकर, विजय आगरे, माजी तंमूस अध्यक्ष हसन शेख, मल्लेश बल्ला, निरंजन डंभारे, प्रवीण सोदारी, अमोल थेरे, तुळशीदास ढवस, बबलू सातपुते, शंकर सिद्दम, नितीन काळे, विवेक तिवारी, राजेश मोरपाका, अनिल मंत्रिवार, गुरूदास तग्रपवार, विशाल दामर, सुशील डांगे, सतिश कामतवार, पांडुरंग थेरे, भाजपा महिला आघाडीच्या सुरेखा डाखरे, जनाबाई निमकर, रेखा पाटील, प्रिया बोरकर, तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here