भारतीय छात्र संसदेत यवतमाळ जिल्ह्याचा शुभम सहभागी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

यवतमाळ : पुणे येथे भारतीय छात्र संसद फांडेशनच्यावतीने ११ व्या सहा दिवसीय भारतीय छात्र संसदेचे आयोजन करण्यात आले होते. यात यवतमाळ जिल्ह्यातून एकमेव वणी येथील शुभम डोंगे पाटील यांनी सहभाग नोंदविला होता.२३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत ही छात्र संसद आभासी पद्धतीने घेण्यात आली. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले.

या परिषदेत केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीयमंत्री मनसूख मंडवीया, केंद्रीयमंत्री पुरूषोत्तम रूपाला, केंद्रीयमंत्री किरण रिजूजू, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, डॉ.सोमय्या स्वामीनाथन, अमेरिकेचे मार्क तुल्ली, बँगलोरचे खासदार तथा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, राहुल कराड, माजी केंद्रीयमंत्री बाबूल सुप्रिओ, लडाखचे खासदार जायमंग नामगयाल, राघव चड्डा या दिग्गज नेत्यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

यावेळी शुभम डोंगे यांनी ‘कृषी बिलो का विरोध क्यू’ या विषयावर आपली बाजू मांडली. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच केंद्र शासनाने कृषी बिल लागू केल्याची माहितीही यावेळी शुभम डोंगे यांनी दिली. तसेच यावेळी राकेश टिकैत यांच्याशी शुभम डोंगे यांनी कृषी बिलाविषयी चर्चा केली. तसेच शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच मोदी सरकारने हे कृषी बिल लागू केल्याचे यावेळी सांगितले. या संसदेत भारतातीलच नव्हे तर विदेशातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.