राज्याचे माजी गृहमंत्री देशमुखांच्या जावयाचे अपहरण?

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे राजीनामा द्यावे लागलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांच्यासह त्यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने वरळी सुखदा येथून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

मात्र, जर असे असेल तर त्यांना सीबीआयकडून रीतसर नोटीस व समन्स देण्यात येणे अपेक्षित आहे. परंतु, त्यांना नोटीस अथवा समन्स देण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, गौरव चतुर्वेदी यांचे अज्ञातांकडून अपहरण झाल्याची माहिती देशमुख कुटुंबीयांनी दिली आहे.