दिवाळीच्या पहिल्या दिवशी  B – TECH विद्यार्थी कुटुंबा देखत वर्धा नदीत बुडाला

घुग्घुस (चंद्रपूर) : शहरा लगत असलेल्या नकोडा निवासी प्रफुल्ल राजम कोंकटी हा दिवाळी सणा निमित्त आपल्या कुटुंबासह राम मंदिर दर्शनाला गेला होता.

परिसरातील वर्धा नदीत आई – बहिणी सह आंघोळीचा आनंद घेत असतांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदी पात्रात बुडाला सदर घटना आज सकाळी अकरा वाजता दरम्यान घडाली.

दिवाळीच्या पहिल्या दिवशीच तरुण होतकरू युवकांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण नकोडा गावात शोककळा पसरली आहे.