शेरज (बुज) येथे महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

कोरपना : लॉकडाऊनच्या काळात सोशल डिस्टन्स चे पालन करून ग्रामपंचायत शेरज (बुज) येथे अहिंसेचे महामेरू राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि जय जवान जय किसान चा नारा लावणारे लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला सरपंच अरविंद तिरणकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित माहिती सांगण्यात आली आणि त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित सरपंच अरविंद तिरणकर, अंगणवाडी सेविका मंगला श्रीरामवार, मदतनीस पिंगला साखरकर, आशा वर्कर गीता साखरकर, ग्रामपंचायतचे शिपाई राहुल कल्लूरवार आणि गावचे सामाजिक कार्यकर्ते रुपेश दुधकर आदी उपस्थित होते.