सीमा लेडांगे यांची तालुका समन्वयकपदी नियुक्ती

भद्रावती (चंद्रपूर) : शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री ना.आदित्य ठाकरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील विविध पदाच्या केलेल्या नियुक्तिमध्ये भद्रावती येथील युवा सामाजिक कार्यकर्त्या सिमा नूतन लेडांगे यांची भद्रावती-वरोरा तालुका समन्वयक पदी नुकतीच निवड केली.

त्यांच्या या नियुक्तीचे युवासेना सदस्य रुपेशजी कदम मुंबई, विद्यापीठ सिनेट सदस्य शितलताई सेठ, चंद्रपूर जिल्हा विस्तारक तृष्णाताई गुजर, शरवरी गावंडे, कंत्राटी कामगार नेते बंदुभाऊ हजारे, युवासेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे, कैलास तेलतुंबडे, चंद्रपूर विधानसभा समन्वयक अमोल मेश्राम, युवासेना तालुका अध्यक्ष नूतन लेडांगे, आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.