“भद्रावतीत विश्व पैदल दिवस साजरा”

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वारापासून विंजासन लेणीपर्यंत निघाली पैदलवारी आ. प्रतिभा धानोरकर यांची उपस्थिती

भद्रावती (चंद्रपूर) : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर, नेहरू युवा केंद्र चंद्रपूर, द असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल स्पोर्ट्स फॉर ऑल चंद्रपूरचे नेतृत्वात तथा भद्रावती नगर पालिकेच्या विद्यमाने दि.3 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता भद्रावतीच्या प्रमुख मार्गाने पैदलवारी नेऊन “विश्व पैदल दिवस-2021″(वर्ल्ड वॉकिंग डे-2021) साजरा करण्यात आला.

बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार येथे भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आ. प्रतिभा धानोरकर यांच्या शुभहस्ते लाल फित कापून व हिरवी झेंडी दाखवून पैदल रॅलीची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष संतोष आमने,रेंशी दुर्गराज रामटेके, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, नगरसेवक प्रफुल चटकी, योग प्रशिक्षक अनंता आखाडे आदी उपस्थित होते तथा विविध शाळांमधील विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

ही पैदल रॅली बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वारापासून मार्गक्रमण करीत जुना बस स्टॉप, नागमंदिर ते विवेकानंद महाविद्यालय ते विंजासन बौद्ध लेणी येथे पोहचून विसर्जीत झाली. यामध्ये गुरूदेव सेवा मंडळ, पतंजली योग समिती, इको-प्रो संस्था, पत्रकार असोसिएशन, नगर परिषद तथा विविध सामाजिक संघटनांनी सहभाग घेतला होता.

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleमहात्मा गांधी जयंती लालबहादूर शास्त्री जयंती साजरी
Editor- Manoj kumar Kankam 9823945554/ 9423845554