आदर्श पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

◆ पाचव्या वर्गातील मुलीच्या गुप्तांगाला हात लावण्याचा आरोप
◆ चौकशीसाठी मुख्याध्यापक पोलिसांच्या स्वाधीन

चंद्रपूर : कोरोना नंतर आज पासून राज्यातील शाळा सुरू झाल्या. अश्या आनंदायी वातावरणात विरजण टाकणारी एक घटना आज सोमवारी (4 आॅक्टोबर) ला चंद्रपूर जिल्ह्यातील केम तुकुम येथे घडली आहे. येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाने एका पाचव्या वर्गातील मुलीच्या गुप्तांगाला हात लावण्याचा किळसवाणा प्रकार उघडकीस आला आहेत. पिडीत मुलीच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापका विरोधात तक्रार दाखल केल्याने चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

बल्लारपूर तालुक्यातील केम तुकूम येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक भाऊराव तुंबडे यांनी, वर्गातील ईतर मुलींना स्वच्छतेसाठी बाहेर पाठवून पाचव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीच्या गुप्तांगणाला हात लावल्याचा किळसवाणा प्रकार केला. शाळेत घडलेला हा प्रकार पिडीत मुलीने घरी गेल्यावर पालकांना सांगितल्याने हि घटना उघडकीस आली. मुलीच्या सांगण्यावरून पालकांसह गावकरी शाळेत पोहचले. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये. म्हणून ईतर शिक्षकांनी मुख्याध्यापकांना वर्गात कुलूपबंद करून ठेवले. माहिती मिळताच पोलिसांनी घटना्स्थळी धाव घेतली. घटनेचं गांभीर्य पाहता परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याची दक्षता घेतली. चौकशीसाठी मुख्याध्यापकांना ताब्यात घेतले असून, मुख्याध्यापक तुंबडे यांचे आश्याप्रकारचे चाळे मागील अनेक दिवसंपासून सुरु असल्याची माहिती ईतर विद्यार्थीनींनी पोलिसांना दिली आहे.

विशेष बाब म्हणजे, मुख्याध्यापक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त आहे. सेवानिवृत्तीसाठी अवघे एक वर्ष शिल्लक राहिले आहे. मुख्याध्याकांवर कारवाई करावी. अन्यथा आमच्या स्वाधीन करावे. अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. याबाबत पोलीस सखोल चौकशी करीत आहेत. अद्याप गुन्हा दाखल झाला नाही. पूर्ण चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांनी दिली आहे.