शाळेच्या पहिल्याच दिवसी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विद्यार्थ्यांचे स्वागत

चंद्रपुर : शाळा उघडताच पहिल्याच दिवसी डॉ. अशोक जिवतोडे यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जिल्ह्यातील विविध शाळांमधे जावून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना चॉकलेट व गुलाबाची फुले देण्यात आली.

आज (दि.४) ला तब्बल दोन वर्षांनंतर शाळा सुरू झाल्या. कोरोना प्रादुर्भावापासून मागील दोन सत्रांपासून शाळा ऑनलाईन स्वरुपात सुरु होत्या. मात्र आता आज (दि.४) पासून ऑफ़लाईन पध्दतीने मुक्त वातावरणात कोविड नियमांचे पालन करुन शाळा सुरु झाल्या. मोठ्या उत्साहात विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन झाले. शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या मधे उत्साह दिसून आला. मधल्या काळात विद्यार्थ्यांचे शाळेत जाणे बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या शालेय सवयींमधे बदल झालेला होता.

मात्र आता शाळा नियमीत झाल्यास शाळेचे शैक्षणिक वातावरण पूर्ववत होईल, अशी आशा व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक संघटना यात सहभागी होत्या.
यावेळी नितिन कुकडे, आशीष महातळे, रवी जोगी, विजय मालेकर, प्रशांत चहारे, प्रविण जोगी, सुनील दहेगांवकर, अमोल ढवस, सुनिल ठावरी, आदी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.