घुग्घुस येथील इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू

घुग्घुस : येथील प्रसिद्ध सिव्हिल ठेकेदार सरोज रॉय यांचा मुलगा अनुराग उर्फ मोनू रॉय वय 21 वर्ष हा आपल्या मित्र ललित ठाकरे 21 वर्ष हे दुचाकीने नागपूर वरून येतांना आज दुपारी तीन वाजता चंद्रपूर – नागपूर मार्गावर टेंबुरडा गावाजवळ सुसाट वेगाने येणाऱ्या ऑल्टो कारने जबर धडक दिली.

या धडकेने दुचाकीचे संतुलन बिघडल्याने दुचाकी खड्ड्यावरून उडून रस्त्याचे द्विभाजकावर आढळल्याने मोनूच्या डोक्यावर जबर मार लागला त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

एका तरुण होतकरू युवकांचा आकस्मिक मृत्यूमूळे सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.