चंद्रपूरचे माजी नगराध्यक्ष ​​धुन्नू महाराज यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

चंद्रपूर : माजी नगराध्यक्ष पं.गायचरण त्रिवेदी उर्फ ​​धुन्नु महाराज यांचे वयाच्या 86 व्या वर्षी मंगळवारी काल ५ ऑक्टोबर रोजी आजारपणामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि पूर्ण कुटुंब आहे.श्री गायचरणजी त्रिवेदी यांच्यासाठी अनेक वर्षे चंद्रपूरचे शहराध्यक्ष रहा. त्यांना सामाजिक क्षेत्रात काम करण्याची तीव्र आवड होती. शहराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. चंद्रपूर शहराची विशेष ओळख प्रस्थापित करण्यात आणि शहरातील रहिवाशांना मूलभूत सुविधा पुरवण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

चंद्रपुरच्या मातीशी समरस झालेला नेता गमावला :
आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपुरचे माज़ी नगराध्यक्ष , ज्येष्ठ नेते गयाचरणजी त्रिवेदी यांच्या निधनाने चंद्रपुरच्या मातीशी समरस झालेला नेता आम्ही गमावल्याची शोकभावना माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

राजकीय क्षेत्रातील कर्मठ, कर्तव्यदक्ष नेता हरपला : खासदार बाळू धानोरकर

नगराध्यक्षपदाच्या काळात धुन्नू महाराज यांनी चंद्रपुरात भव्य वास्तू उभ्या केल्या. प्रशासनावर त्यांची पकड होती. त्यांच्या निधनाने धुन्नू महाराज यांच्या निधनाने चंद्रपूरच्या राजकीय क्षेत्रातील कर्मठ, कर्तव्यदक्ष नेता हरपला. कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना खासदार बाळू धानोरकर यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केली आहे.

शिस्तप्रिय, प्रभावशाली व्यक्तिमत्त्व हरपले :
आ. किशोर जोरगेवार

धन्नू महाराज यांनी नगराध्यक्ष असतांना आपल्या शिस्तीने प्रशासनावर अंकुश ठेवत चंद्रपूरात अनेक असाधारण गोष्टी सहज शक्य करून दाखविल्यात त्यांच्याच कार्यकाळात चंद्रपुरची प्रमुख ओळख असलेली सात मंजली इमारत उभी राहिली. आज त्यांच्या जाण्याने चंद्रपूरकरांनी एक शिस्तप्रिय आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व कायमच गमावलं असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.