19 वर्षीय लेखिका आरुषी विवेक जैन हिच्या पुस्तकाचे प्रकाशन

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

◆ कमी वयात लिहिले ‘थर्टी टाईम्स व्हेन युवर कॉनशन्स निड्स यु’ पुस्तक

चंद्रपूर : येथील 19 वर्षीय लेखिका आरुषी विवेक जैन हिने लिहलेले ‘थर्टी टाईम्स व्हेन युवर कॉनशन्स निड्स यु’‘Thirty Times When Your Consciousness Needs You’हे पुस्तक प्रकाशित झाले असून, इतक्या कमी वयात तिने केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यात लेखिका बनण्याचा मानस तिने बुधवार, 7 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर प्रेस क्लब येथे आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केला.

आरुषीचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण येथील चांदा पब्लिक स्कूल येथे झाले असून, सध्या ती पत्रकारितेचे शिक्षण घेत आहे. लेखनाची प्रेरणा अजोबाकडून मिळाल्याचे तिने सांगितले. तिने अनेक लेख लिहले आहे. तिची लहानपणापासून लेखनातील आवड ओळखून आई, वडिलांनी तिला सतत प्रोत्साहित केले.

‘थर्टी टाईम्स व्हेन युवर कॉनशन्स निड्स यु’‘Thirty Times When Your Consciousness Needs You’हे तिचे पहिले पुस्तक प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक प्रत्येकाला आपल्या जीवनातील समस्या सोडविण्याकरिता एखाद्या मित्राचे काम करेल, असे तिने सांगितले. पत्रपरिषदेला तिचे वडील विवेक जैन, आई तसेच चांदा पब्लिक स्कूलच्या संचालिका स्मिता जीवतोडे, भावना व्ही. एस. प्रभृती उपस्थित होते.

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp
Previous articleचार दिवस पुरेल एवढाच कोळसा, देशावर वीज संकट? पाहा महाराष्ट्रात नेमकी काय स्थिती
Editor- Manoj kumar Kankam 9823945554/ 9423845554