लघुशंकेसाठी गेलेल्या युवकाचा छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला मृतदेह

◆ जंगली श्वापदाने त्या युवकाला ठार करून खाल्याचा संशय

चंद्रपूर : जवळील वेकोलिच्या पद्मापूर कोळसा खाणीत कार्यरत शेरावाली ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये ट्रक हेल्पर म्हणुन काम करणार्‍या एका युवकाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील जंगलात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना काल गुरूवारी उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, शेरावाली ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये हेल्पर म्हणुन कार्यरत हा युवक लघुशंकेसाठी म्हणुन सायंकाळी 6 च्या सुमारास कॅम्प च्या बाहेर पडला. मात्र रात्री 9 वाजेपर्यंत तो परत न आल्याने तिथे कार्यरत इतर कर्मचाऱ्यांनी त्याचा शोध घेणे सुरू केले. दरम्यान त्याच्याशी संपर्क करण्यासाठी त्याच्याकडे असलेल्या भ्रमणध्वनीवर फोन करणे सुरू होते. भ्रमणध्वनीची घंटी वाजत असुनही तो फोन उचलत नव्हता.
त्याचा शोध सुरू असताना काही कर्मचारी कॅम्प जवळच असलेल्या जंगलाच्या दिशेने सुद्धा गेले. ह्यावेळी मात्र त्या युवकाच्या भ्रमणध्वनीची घंटी स्पष्टपणे ऐकायला आल्यामुळे त्यांनी त्या दिशेने मोर्चा वळवला असता त्या बेपत्ता युवकाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून एकच खळबळ उडाली.

सदर घटनेची माहिती हे वन विभागाला दिली. त्यानुसार वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला असुन युवकाचे प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी पाठविले. घटनास्थळावरील त्या युवकाच या मृतदेहाचे दृश्य बघता त्याला वाघ अथवा बिबट्याने हल्ला करून ठार केल्याचा संशय निर्माण झाला आहे. त्या युवकाचा चेहरा व कंबरेखालील भाग खाल्ला असल्याचे जंगली श्वापदांनीच त्याला ठार केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणने आहे. वनविभाग घटनेचा तपास करीत असुन हा हल्ला नेमक्या कोणत्या श्वापदांनी केला ह्याचा शोध घेणे सुरू आहे.