गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज : खासदार बाळू धानोरकर

• चंद्रपूर तालुक्यातील ५६ गावातील ३८ ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे २७ अध्यक्षाचा सत्कार

चंद्रपूर : गावाच्या विकासाच्या योजनांचा लाभ गावपातळीवर देण्यासाठी शासन आणि यंत्रणांनी कितीही नियोजन केले तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी आणि गावाचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि गावपातळीवर काम करणाऱ्या यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची गावाच्या विकासाप्रती चांगली मानसिकता असणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते कृषीउत्पन्न बाजार समिती चंद्रपूर येथे चंद्रपूर तालुक्यातील ५६ गावातील ३८ ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे २७ अध्यक्षाचा सोहळा पार पडला. त्यावेळी बोलत होते.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, रोशन पचारे, पवन अगदारी, बसंत सिंग, नागेश बोडे, प्रभाकर ताजने, गणेश आवारी,सुनील पाटील, शीला मेकलवार, योगेश बोबडे, चंद्रकांत गुरू , राजू रेड्डी, सय्यद अनवर प्रभाकर सिडाम लखन हिकरे ,नारायण खापणे, भगवती पिदूरकर, ऋतिका नरुले, कृष्णाजी बाम,अंकुश चौधरी, शंकर उईके, शैलेश अलोणे, रमेश बुचे, प्रेमचंद जोगी, सदाशिव खोब्रागडे, रवी सुत्रापवार, सुनील पाटील, सुनील मासिरकर, राजकुमार नागपुरे, रवींद्र पाहानपट्टे, चंदू मातणे, सुधाकर वारारकर, हितेश लोडे यांची उपस्थिती होती.

यावेळी डॉ. दिलीप कांबळे, डॉ. सौरभ राजूरकर, डॉ. सुवर्णा मानकर, डॉ. किशोर जेणेकर, अयोग्य सेवक रवी चेपुरवार, बाजार समितीचे सचिव संजय पावडे यांच्या कोरोना वॉरियर्स म्हणून सत्कार करण्यात आला.

गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांच्या एकजूटीची आवश्यकता विशद करुन खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, ग्रामपंचायत ही गावाचे मंदीर झाली पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा, आणि पिण्याचे पाणी देणारी व्यवस्था ग्रामपंचायतमधून निर्माण झाली पाहिजे. ग्रामविकासाची कुंडली लोकप्रतिनिधींनी तयार केली पाहिजे. या कुंडलीमध्ये शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, सिंचनाची व्यवस्था आणि रोजगार निर्मितीचे नियोजन असले पाहिजे तरच ग्रामविकासाला चालना मिळेल असा विश्वास खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केला.