घुग्घुस : येथील लॉयड्स मेटल कंपनीतील मृतक कामगार सुमरण सोनबोईर यांच्या कुटुंबीयास राजेंद्र अडपेवार कामगार परिवार व भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी आर्थिक मदत दिली.
लॉयड्स मेटल कंपनीतील कामगार सुमरण सोनबोईर यांच्या कंपनीत अपघात झाला होता जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले होते परंतु त्यांच्या उपचारादरम्यान दिनांक 29/05/2021 रोजी मृत्यू झाला.
लॉयड्स मेटल कंपनीतील राजेंद्र अडपेवार कामगार परिवार व भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून मृतक कामगाराच्या कुटुंबीयास आर्थिक मदत दिली.
यावेळी भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, मृतक कामगाराची पत्नी श्रीमती अनुसया सोनबोईर त्यांचा मुलगा रवी सोनबोईर, भाजपाचे संजय भोंगळे राजेंद्र अडपेवार कामगार परिवाराचे सुधीर बावणे, पंकज रामटेके, शंकर कलवल, लक्ष्मण ताटपेल्ली, राजकुमार मुळेवार, लक्ष्मण येनगंदला, सुखदेव आगदारी, देवकुमार सलामे, शालिक शिवरकर, अंकुश बर्रे उपस्थित होते.