महाराष्ट्र विधीमंडळ अंदाज समिती तीन दिवस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर : महाराष्ट्र विधीमंडळ अंदाज समिती 12 ऑक्टोबर 2021 पासून तीन दिवस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. समिती प्रमुख आमदार रणजित कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली सदर समिती 12 ते 14 ऑक्टोबर 2021 या कालावधीत जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन पाहणी करतील.

मंगळवार दि. 12 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजतापर्यंत शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे संबंधित विभागांच्या प्रमुख अधिका-यांसोबत चर्चा, सकाळी 10.30 ते 10.45 वाजतापर्यंत समितीची अंतर्गत बैठक. सकाळी 10.45 ते दुपारी 2 वाजतापर्यंत जिल्ह्यात विविध विभागांतर्गत राबविण्यात येणारे प्रकल्प/ कामे / योजनांना भेट व पाहणी. दुपारी 2 ते 3 वाजतापर्यंत राखीव. दुपारी 3 ते सायंकाळी 5.30 वाजतापर्यंत विविध ठिकाणी भेट व पाहणी करतील. रात्री शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे मुक्काम.
बुधवार दि. 13 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजतापर्यंत विविध प्रकल्प / कामे / योजनांना भेट व पाहणी, दुपारी 2 ते 3 वाजतापर्यंत राखीव. दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजतापर्यंत विविध ठिकाणी भेट व पाहणी करतील. रात्री शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथे मुक्काम.

गुरुवार दि. 14 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजतापर्यंत विविध प्रकल्प / कामे / योजनांना भेट व पाहणी, दुपारी 2 ते 3 वाजतापर्यंत राखीव. दुपारी 3 ते सायंकाळी 5 वाजतापर्यंत, पाहणी दरम्यान आढळून आलेल्या बाबींसंदर्भात संबंधित अधिका-यांसोबत बैठक.

◆ महत्वाचे : सदर समिती संविधानिक असून तिचे कामकाज गोपनीय स्वरूपाचे असल्यामुळे सर्वसाधारण जनतेसाठी खुले असणार नाही. समितीने दिलेल्या भेटीसंदर्भात अधिकाऱ्यांच्या साक्षीनंतर, मंत्रालयीन सचिवांची साक्ष होणार आहे. त्यानंतर सदरचा अहवाल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर होईल. त्यावेळी सदर अहवाल जनतेसाठी खुला असेल असे कळविण्यात आले आहे.