…भाडे वाढ झाली नाही तर वाहने उभे ठेवणार
चंद्रपूर : नागपूरचे सर्व वाहतूकदार, चंद्रपूर, वणी, यवतमाळ, सिमेट, कोळसा, फ्लाय एश वाहतूक नागपूर ट्रक युनिटचे अध्यक्ष श्री कुक्कू मारवाह यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल प्राइड, येथे नुकतीच एक बैठक संपन्न झाली.
या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा होता की डिझेल, पेट्रोलचे भाव गगनाला भिडत आहेत आणि त्या बदल्यात सिमेंट कंपन्या, पोलाद कंपन्या आणि कोळसा व्यापारी वाढत्या किमतींनुसार भाडे वाढवत नाहीत. त्यामुळे वाहतूकदार यांना त्यांचे वाहने उभे करण्याशिवाय पर्याय दिसत नाही.
बैठकीत एकमताने निर्णय घेण्यात आला की येत्या दोन दिवसात विदर्भातील सर्व सिमेंट, स्टील, कोळसा, फ्लाय ऍश कंपन्यांना लेखी मागण्या सोपविण्यात येतील आणि वाहतूकदारांच्या मागण्यांवर चार दिवसांच्या आत योग्य निर्णय घेण्याची विनंती केली जाईल.
अन्यथा आम्ही सिमेंट, स्टील, कोळसा, फ्लाय एशचे सर्व प्रकारची वाहतूक थांबविण्यात येईल. या बंदमुळे झालेल्या नुकसानास सर्व सिमेंट कंपन्या, स्टील आणि कोळसा पुरवठादार जबाबदार असतील.
या बैठकीत श्री. मनीष चड्डा, श्री. गुरदियाल सिंग चड्डा, श्री. पंकज जैन, श्री हरजित सिंग (DNR), श्री देवेंद्र सिंह अलग (SKRC), निर्भय ट्रान्सपोर्ट्स, श्री हरकरण सिंह तुली, रोहित (पीएमपी ट्रान्सपोर्ट्स), जे.एस. ट्रान्सपोर्ट्स, वाहेगुरु ट्रान्सपोर्ट्स के लालवानी, सरवन सिंग (केएफटी), खान ट्रान्सपोर्ट्स, अवतार सिंग (यूनिक लॉजिस्टिक्स), पियुष जैस्वाल, बावरीयाजी, परमजीत सिंग, (डीएनआर वणी), साहनी, अमरीक सिंग बाल इत्यादी उपस्थित होते.