विजुक्टा तर्फे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

चंद्रपुर : अनुदानित व्यवस्था नेस्तनाभुत करण्याच्या शासन धोरणाच्या विरोधात व उच्च माध्यमिक शिक्षकांच्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी विजुक्टा तर्फे आज दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

हा आंदोलनाचा दुसरा टप्पा असुन या अगोदर राज्यातील तालुका कार्यकारीणीद्वारे दि. १४ जुन व दि.२९ सप्टेंबर रोजी तहसिलदार मार्फत शासनाला निवेदन देण्यात आले होते.

१ नोव्हेंबर २००५ पुर्वीच्या टप्पा अनुदानावरील शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागु करावी, १ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना सरसकट जुनी पेंशन योजना लागु करावी, घोषीत व अघोषित तुकड्यांना अनुदान दया, राज्यातील वाढीव अर्धवेळ पदांना मान्यता दया, विद्यार्थी पटसंख्येचे निकष, वेतनातील अनियमीतता आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन असुन आंदोलनानंतर शिक्षणाधिकारी मार्फत राज्य शासनाला निवेदन देण्यात येणार आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन विजुक्टा जिल्हाध्यक्ष प्रा. राजेंद्र खाडे, सचिव प्रा. दिलीप हेपट, माजी जिल्हाध्यक्ष प्रा. अशोक पोफळे यांनी केले आहे.