मेटाँडोर च्या धडकेत आजी व नातीन ठार

• भिकेश्वर येथील घटना
• सकाळी फिरायला जाणे जीवावर बेतले

चंद्रपूर : मॉर्निंग वॉक ला गेलेल्या आजी व नातनी वर आज रोजी सकाळी 6.30 वाजताच्या दरम्यान भाजीपाला घेऊन नागभीड कडून ब्रम्हपूरी कडे जाताना आयशर मेटाडोर क्रं MH33/T 2470 चे चालकाने आपले ताब्यातील वाहन अविचाराने व भरधाव वेगाने चालवून भिकेश्वर फाटा येथे फिरायला गेलेल्या सुगंधा विश्वनाथ अनवले (वय 60) रा भिकेश्वर व नातीन हार्दिका अमन मिसार (वय 6 ) रा सुलेझरी यांना वाहनाची धडक मारून गंभीर जखमी केले व वाहन रोड कडेला विद्युत खांबाला धडकून पलटी झाले.

वाहनचालक घटनास्थळावरून पळुन गेला, सुगंधा अनवले यांचा जागु मृत्यू झाला, हार्दिका मिसार उपचार दरम्यान ग्रामीण रुग्णालय नागभीड येथे मरण पावली,सदर प्रकरणी वाहन चालका विरुद्ध कलम 279,304(अ) भा द वि सहकलम 184,134/177 मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेने गावात शोककळा पसरली आहे.