नकोडा येथील वेकोलीच्या झोपडपट्टीची वीज समस्या सोडवा

नकोडा ग्रामपंचायत माजी उपसरपंच हनीफ मोहम्मद यांची मागणी

घुग्घुस : नकोडा गावातील वेकोलीच्या झोपडपट्टीतील वीज एक महिन्यापूर्वी वेकोलीने कापली त्यामुळे येथील गोर गरीब नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे वीज नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास अडचणीचा सामना करावा लागत असून त्यांचे भविष्यही अंधारमय होत आहे.

1970 च्या दशका पासून वेकोलीचा वीज पुरवठा नकोडा गावातील झोपडपट्टीत होता परंतु एक महिन्यापूर्वी हा वीज पुरवठा वेकोलीने खंडित केला त्यामुळे येथील नागरिकांत तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

वीज पुरवठा नसल्याने चोरट्याच्या भीतीने नागरिक जागरण करीत आहे.काही दिवसापूर्वीच नकोडा येथील पाण्याच्या टाकीचे पत्रे चोरट्यानी कापून चोरून नेले त्यामुळे येथील नागरिक भयभीत झाले आहे.
ही समस्या लक्षात घेऊन नकोडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच हनीफ मोहम्मद यांनी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना निवेदनातून मागणी केली आहे.

सोमवार 16 ऑगस्ट रोजी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर हे घुग्घुस येथे दौऱ्यावर आले असतांना नकोडा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच हनीफ मोहम्मद यांनी त्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले यावेळी चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी वीज समस्येचा पाठपुरावा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले व वेकोलीच्या अधिकाऱ्याची बैठक लावू असे सांगितले.
यापूर्वी नकोडा ग्रामपंचायत माजी उपसरपंच यांनी घुग्घुस वेकोलीचे उपक्षेत्रीय प्रबंधक यांची भेट घेऊन विजेच्या समस्येबाबत चर्चा केली.