आई – वडिलांच्या देखत आठ महिन्याचा चिमुकला ठार

चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील रामपूर – माथरा रोडवरील वळणावर आज गुरुवारी सायंकाळी ६ वाजता झालेल्या मोटरसाईकल अपघातात चिण्णा महेंद्र चित्तलवार (वय ८ महिने) व संदीप सुधाकर काटवले (वय २८) यांचा मृत्यू झाला तर महेंद्र चित्तलवार व अल्का चित्तलवार जखमी झाल्या असून जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे.

सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान महेंद्र चित्तलवार हा पत्नी अल्कासह आपल्या आठ महिन्याचा मुलाला राजुऱ्याकडे दवाखान्यात येत असताना विरुद्ध दिशेने राजुरा कडून साखरीकडे येणाऱ्या संदीप सुधाकर काटवले यांची रामपूर-माथरा वळणावर दोन्ही मोटार सायकलची जोरदार धडक झाली यात महेंद्र चित्तरवार यांचा आठ महिन्याचा मुलगा चिण्णा हा जागीच ठार झाला तर संदीप काटवले हा दवाखान्यात उपचाराकरिता अनंत असताना मृत पावला.

महेंद्र चित्तरवार व अल्का चित्तरवार हे दोघे पती पत्नी जखमी असून यांना उपचाराकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.