नरेंद्र मोदींची लोकप्रियता घटली

कोरोना महामारीमुळे देश आणि संपुर्ण जगात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अर्थव्यवस्थेसह आरोग्यव्यवस्थाही कोलमडली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांनी आपला जीव गमावला. इतकेच नव्हे नैसर्गिक आपत्तीनेही देशात लाखोंचे वित्तीय नुकसान झाले. कोरोना महामारी, नैसर्गिक आपत्ती, महागाई, शेतकरी आंदोलने अशा एक ना अनेक कारणांमुळे आज देशात चिंतेते वातावरण आहे.

या विविध घटनांच्या पार्श्वभुमीवर एका इंग्लिश वृत्तवाहिनीने केलेल्या सर्वेक्षणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ६६ टक्क्यांवरुन २४ टक्क्यांवर आल्याचं म्हटलं आहे. इंडिया टूडे मूड ऑफ द नेशन पोलने हे सर्वेक्षण केले आहे.