20 ऑगस्ट रोजी काँग्रेसचा आढावा बैठक

ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे उद्या घुग्घुस शहरात

घुग्घुस : महाविकास आघाडी शासनाने घुग्घुस ग्रामपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा मिळवून दिला.
येत्या काही दिवसातच घुग्घुस नगरपरिषदेची निवळणुक होण्याचे चिन्ह दिसत आहे.

निवडणूकी पूर्वी काँग्रेस पक्षातर्फे केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी उद्या दिनांक 20 ऑगस्ट रोजी जिल्हाध्यक्ष प्रकाश भाऊ देवतळे यांच्या नेतृत्वाखाली आढावा बैठक सांयकाळी 06 वाजता शहर काँग्रेस कार्यलयात घेण्यात येत असून सर्व काँग्रेस आजी – माजी पदाधिकारी, माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी जिप उमेदवार सर्व कार्यकर्ते उपस्थित राहावे असे आवाहन शहर अध्यक्ष राजूरेड्डी यांनी केले आहे.