चंद्रपूर : आपल्या देशाचे *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी *उज्ज्वला गॅस योजना 2.0* सुरु करण्यात आली आहे. घुग्घुस परिसरातील गरजू महिलांनी उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सूचनेनुसार भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी केले आहे.
घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे 164 गरजू लाभार्थी महिलांचे मोफत ऑनलाईन अर्ज भरून देण्यात आले आहे व लाभार्थी महिलांना मोफत अर्ज भरून देणे सुरु आहे.
संशोधनात आढळून आले आहे की 10 सिगारेट पाकीट पिल्याच्या धुरा इतका घातक धूर महिलांना सहन करावा लागतो. या योजनेतून त्यांना धुराच्या त्रासा पासून मुक्ती मिळणार आहे.
महिलांनी जागरूकता पाळून अर्ज करणे आवश्यक आहे. घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या माध्यमातून मोफत अर्ज भरून देण्यात येत आहे. मागील योजना उज्ज्वला 1.0 मध्ये 350 च्या वर गरीब लाभार्थ्यांना गॅस जोडणीचा लाभ सुधिरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मिळवून देण्यात आला हे विशेष. यावेळी भाजपा नेते अजय आमटे, प्रवीण सोदारी, बबलू सातपुते, सुनंदा लिहीतकर तथा असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.