चंद्रपूर : मूल तालुक्यातील चिचपल्ली वनपरिक्षेत्र मूल,दहेगाव नियतक्षेत्राअंतर्गत येणा-या कवडपेठ येथील 50 वर्षीय व्यक्तीवर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. दिवाकर ढिवरू भेंडारे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. काल सोमवारी कवडपेठ गावालगत असलेल्या कक्ष क्र 517 मध्ये गुरे चारत असताना दुपारी अंदाजे 3.30 वाजता च्या दरम्यान वाघाने हल्ला करून दिवाकर भेंडारे यांना किरकोळ जखमी केले.
सदर व्यक्तीला गावातील गुराखी यांनी उपचारासाठी तात्काळ उपजिल्हा रूग्णालय मूल येथे प्राथमिक उपचार करूण घेण्यासाठी आणण्यात आले. प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरीता वनपरिक्षेत्र अधिकारी चीचपल्ली कु.प्रियांका वेलमे मॅडम यांच्या नेतृत्वात क्षेत्रसहायक प्रशंात खणके,यांनी स्वतःहा पुढाकार घेऊन वनरक्षक राकेश गुरनुले,यांच्या सहकार्याने जखमी रूग्णाला चंद्रपूर येथे हलविण्यात आले.
उपजिल्हा रूग्णालयात वनरक्षक फाॅरेस्ट गार्ड मानकर व गावकरी उपस्थित होते. जखमी रूग्ण दिवाकर किरकोळ स्वरूपात जखमी असल्याचे सांगण्यात आले असले तरी वनविभागाच्या वतीने जखमी रूग्णांची देखभाल करण्यात येत असल्याने सांगण्यात आले.या आधी आठ महिन्यांपूर्वी कावडपेठ येथील जंगलात गुरनुले नामक इसमावर वाघाने हल्ला करून ठार केले आहे.