वैष्णवी आंबटकर हिच्या मारेक-याला फाशी दया – यंग चांदा ब्रिगेडची मागणी

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

इंदिरा नगर येथे कॅंडल मार्च काढत घटनेचा निषेध

चंद्रपूर : एकतर्फी प्रेमातून घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने इंदिरा नगर येथे कॅंडल मार्च काढण्यात आला. यावेळी वैष्णवी आंबटकर हिच्या मारेक-याला फाशी दया अशी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, उपाध्यक्ष नरेश आत्राम, एसबीसी प्रमुख रुपेश मुलकावार, सिद्धार्थ मेश्राम, शकील शेख, अशोक तुमराम, नितेश बोरकूटे, सतीश सोनटक्के, गणेश इसंनकर, नवीन चांदेकर वैशाली मेश्राम, प्रीती मडावी, नंदिनी मेश्राम, नीलिमा चांदेकर, मिनू जमगडे, माधुरी पेंडोर, उषा मेश्राम, जोस्त्ना कुळमेथे, यशोधा उईके, लता मश्राम, सावंत उईके, शिवा तूरणकर, बाळू कुळमेथे आदिंची उपस्थिती होती.
एकतर्फी प्रेमातून 35 वर्षीय प्रफुल आत्राम या युवकाने 18 वर्षीय वैष्णवी आंबटकर हिच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्यात जखमी झालेल्या वैष्णवीचा उपचारा दरम्याण मृत्यू झाला. या घटनेनंतर चंद्रपूरकरांमध्ये रोष आहे. दरम्याण सदर प्रकरणातील नराधम आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

तसेच सदर प्रकरणाचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालविण्याची मागणीही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने कॅंडल मार्च काढण्यात आला. इंदिरा नगर येथील विश्वशांतील बुध्द विहारा जवळून निघालेला कॅंडल मार्च आरोपीला फाशी द्या अशा घोषणा देत मुल रोडजवळील रेल्वे रुळापर्यंत पोहचला येथे स्व. वैष्णवी आंबटकर हिला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या कॅंनल मार्च मध्ये परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.