संचालक मंडळाचा जमिन खरेदी प्रकरणात कोटींचा गैरव्यवहार

Facebook
Twitter
Telegram
WhatsApp

चंद्रपूर जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडीट सोसायटी मधील प्रकार

चंद्रपूर : येथील जिल्हा परिषद मध्ये नुकतेच येथील बोगस प्रकरण नोकरी समोर आले असताना पुन्हा खुद्द जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनाच कर्मचाऱ्यांनी गंडविल्याची बाब समोर आली आहे.संचालक मंडळाचा जमिन खरेदी प्रकरणात कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे.

जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडीट सोसायटी चे संचालक मंडळ, चंद्रपूर यांनी मौजा कोसारा येथे 12000 स्क्वेअर फूट (12 गुंठे) जमीन रुपये 2100/- इतक्या मोठ्या दराने खरेदी करून मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. सदर जमिनीची खरेदी करीता आमसभेत कोणताही ठराव पारित झालेला नसतांना सोसायटीचे संचालक मंडळ यांनी अवैध ठराव तयार करून अत्यंत गोपनीयरित्या सदर प्रकार, संचालक मंडळाचा कार्यकाल संपत असतांना, दि. 08 जून 2021 महिन्यात केल्याचे दिसून आले.

सदर प्रकरणी संचालक मंडळाने एकूण 2,67,83,160/- (दोन कोटी सदुसष्ठ लक्ष त्र्यांशी हजार एकशे साठ रुपयाचा) घोटाळा व गैरव्यवहार करत सभासदाची फसवणूक करत भ्रष्टाचार केल्याचे समजते.

सदर जागेची खरेदी मौजा कोसरा येथे सर्वे क्र. 139 भूखंड क्र. 50, 51 व 52 खरेदी केलेली असून सदर जागेचे शासकिय बाजार मूल्य केवळ रुपये 24,33,000/- चोवीस लक्ष तेहतीस हजार इतकेच आहे व सदर जागेवर सद्यस्थितीत जागेची बाजार भाव किंमत रुपये 600-700/- इतक्या प्रति चौ. फूट दरा प्रमाणे सुरू आहे. तरीही कोणताही ठराव पारित न करता परस्पर तीन पट किमतीने जागा विकत घेतल्याचे उघडकीस आले आहे.

सोसायटी करीता रामनगर येथे प्रशस्त इमारत असताना सभासदांची फसवणूक करत व अनुपस्थित सभासदाचे अनुमोदन घेत जमीन खरेदीचे ठराव मंजूर करत सदर गैरव्यवहार केल्याचे दिसून आले. गैरव्यवहाराचे मुख्य सूत्रधार श्री अजय डोर्लीकर, उमाकांत पिंपळशेंडे, अजय टेप्पलवार व सदानंद कवठे हे आहेत.