चंद्रपूर : वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानानुसार मतदानाचा अधिकार प्राप्त होतो. आगामी महापालिका, नगरपरिषद/नगरपंचायती आणि जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये नवमतदारांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याची संधी आहे. निवडणूक आयोगातर्फे पुर्ननिरीक्षण कार्यक्रमानुसार १ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
त्यानंतर दावे व हरकती विचारात घेतल्यानंतर अंतिम मतदार यादी ५ जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
त्या अनुषंगाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अथवा निवडणूक लढविण्यासाठी जास्तीत नवमतदारांनी (१८ वर्षे पूर्ण झालेला नागरिक) आपली नावे वेळीच मतदार यादीत नोंदवावी तसेच आधीच नाव समाविष्ट असलेल्या मतदारांनी काही दुरुस्ती करावयाची असल्यास त्यासाठी अर्ज करावा असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात आले आहे.