किशन फौंडेशनच्या वतीने ‘खोजागिरी’ कार्यक्रम संपन्न

चंद्रपूर : किशन फाउंडेशन च्या वतीने शहरातील वडगाव परिसरातील शिव नगरात कोजागिरी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महापौर राखी कांचर्लावार यांच्या सह माजी स्थायी समिती अध्यक्ष रवी आस्वानी, नगरसेवक पप्पू देशमुख, नगसेवक देवानंद वाढई, भाजप शहर अध्यक्ष मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे यांची उपस्थिती होती.

किशन फाउंडेशनच्या अध्यक्ष भारती दुधानी यांनी महापौरा सह सर्वांचे शाल श्रीफक देवून स्वागत केलं. यावेळी महापौर कांचर्लावार यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधत परिसरातील समस्या जाणून घेत पूर्ण करण्याचे आश्वासन दिलं. नगरसेवक पप्पू देशमुख यांनी परिसरातील नागरिकांना कोजागिरीच्या शुभेच्छा दिल्या. किशन फाउंडेशन च्या वतीने हनुमान मंदिरात अनेक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. उत्साहात परिसरातील नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी किशन फाउंडेशनच्या अध्यक्ष भारती दुधानी, उपाध्यक्ष सुनीता कासमगोट्टूवार, सचिव संजय गोडे, कोषाध्यक्ष मनोज दुधानी, सह सचिव चंदन तिवारी, सुनील बोकडे, जेष्ठ सदस्य कन्नाक, भटपल्लीवार, सोनकुसरे, शर्मा, पंचवाणी, राव, पाठक,बुटले, उंदीरवाडे, पराते सह परिसरातील नागरिकांचा सहभाग होता.