शेतकरी आंदोलन समर्थनाथ 27 सप्टेंबर घुग्घुस बंद ला सहयोग द्यावा

घुग्घुस : देशातील जनतेला फसवे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या मोदी शासनाने हुकूमशाही राजवटीच्या धर्तीवर देशातील शेतकऱ्यां विरोधात तीन नवीन काळे कायदे मंजूर केले. हे नवीन कायदे शेतकऱ्यांना जाचक व उध्वस्त करणारे असल्याने हे कायदे मागे घेण्यात यावे या मागणीला घेऊन मागील अकरा महिन्या पासून देशातील शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करीत आहे.

अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू झालेले आहे.
शेतकऱ्यांची बाजू ऐकून समस्यां तातळीने सोडविण्या ऎवजी उद्योगपतीचे कैवारी हे शेतकऱ्यांवर विविध स्वरूपाचे अन्याय अत्याचार करीत आहे.

शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ तसेच पेट्रोल – डिजल – स्वयंपाक गॅस महागाईच्या निषेधार्थ, बेरोजगारीच्या निषेधार्थ उद्या दिनांक दिनांक 27 सप्टेंबर रोजी भारत बंदला सहयोगा करिता घुग्घुस बंद करण्यात येत असून व्यापारी बांधव व नागरीकांनी सहयोग करण्याचे आवाहन घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी, रोशन पचारे जिल्हाध्यक्ष किसान कॉंग्रेस, पवन आगदारी जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग, कामगार नेते सैय्यद अनवर, महिला शहर अध्यक्ष सौ. विजया बंडीवार, युवक जिल्हा उपाध्यक्ष सुरज कन्नूर, घुग्घुस युवक शहर अध्यक्ष तौफिक शेख यांनी केलेले आहे.