खावटी वाटप केंद्रावर भाजयुमो नेत्याचा आदिवासी बांधवा सोबत वाद : व्हिडीओ वायरल

घुग्घुस : आदिवासी समाज बांधवाचे खावटी वाटप मंजूर झाले असून सदर खावटी वाटप हे दुर्गापूर येथे करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी समाज बांधवाला मिळाली त्या अनुषंगाने त्यांनी सदर माहिती काँग्रेस नेत्यांना देण्यात आली. काँग्रेस शिष्टमंडळाने पालकमंत्री यांची भेट घेऊन आदिवासी बांधवाची आर्थिक परिस्थिती बघता सदर वाटप घुग्घुस येथेच करण्यात यावी अशी मागणी केली. सदर मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रकल्प अधिकारी यांनी सदर खावटी घुग्घुस येथे देण्याची सूचना दिली.

त्यामुळे आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळेत वाटपाला सुरुवात करण्यात आली वाटप ठिकाणी काँग्रेस नेत्यांनी भेट दिली समाज बांधव यांच्या विनंतीस मान देऊन त्यांनी खावटी वाटपाचे विधिवत उदघाटन केले.

याप्रसंगी आलेल्या भाजप नेत्यांचा थयथयाट शुरू झाला त्यांनी आपल्या सहकार्यासह अधिकारी व समाज बांधवा सोबत वाद – विवाद करण्यास सुरुवात केली.
या विवादाचे व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारीत होताच सर्वत्र खमंग अश्या चर्चेला सुरुवात झाली. नागरिकांचे असे म्हणने आहे की यापूर्वी भाजपची सत्ता असताना प्रत्येक शासकीय कामात व उदघाटनात सर्वात पुढे असणारे नेत्याला आज त्याठिकाणी शासकीय नियम आठवत होते.

खावटी वाटपाच्या ठिकाणी अश्या वादामुळे त्याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने खावटी वाटप स्थळी पोलीस पोहोचले व पोलिसांच्या उपस्थितीत वातपास सुरुवात करण्यात आली.